दादासाहेब कन्नमवार – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांचा जन्म चंद्रपूर जिल्ह्यातला. १९२० पासून ते स्वातंत्र्यचळवळीत सहभागी होते. तसेच जून, १९४८ साली ते नागपूर प्रदेशाचे काँग्रेसचे अध्यक्ष झाले. जुन्या मध्य प्रदेशात १९५२ मध्ये त्यांची आरोग्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर १९६० साली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड केली गेली आणि नोव्हेंबर १९६२ मध्ये त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा मान मिळाला.
चंद्रपूर म्हणजे आमटे कुटुंबियांची (बाबा, डॉ. विकास, डॉ. भारती) कर्मभूमीच. येथे सामाजिक सेवा प्रकल्प उभा करुन, आनंदवन सारख्या उत्कृष्ट प्रकल्पाची स्थापना करुन आमटे कुटुंबियांनी जगाच्या नकाशावर चंद्रपूर जिल्ह्याला विशेष स्थान प्राप्त करुन दिले.
Leave a Reply