मो. ग. रांगणेकर – ज्येष्ठ साहित्यिक. यांचा जन्म ठाणे येथे झाला. ”सत्यकथा’ या मासिकाचे ते काही काळ संपादक होते. तसेच त्यांनी १९४१ साली नाट्यनिकेतन ही संस्था स्थापन केली. कन्यादान, भटाला दिली ओसरी ही त्यांची काही प्रसिद्ध नाटके होत. १९६७ साली गोव्यात भरलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
ताराबाई मोडक व अनुताई वाघ – बालशिक्षण, गामशिक्षण या विषयांतील ताराबाई मोडक यांचे कार्य मूलभूत मानले जाते. ताराबाईंनी १९४५ मध्ये जिल्ह्यातील बोर्डी येथे (ता. डहाणू) ग्राम बालशिक्षा केंद्र स्थापन केले. पुढील काळात या जिल्ह्यातूनच त्यांनी शिक्षणविषयक कार्य केले. या बाल शिक्षा केंद्राचे कार्यलय १९५७ मध्ये कोसबाड (जिल्हा ठाणे) येथे हलवण्यात आले. अनुताई वाघ यादेखील शैक्षणिक कार्यात ताराबाईंबरोबर कार्यरत होत्या. बोर्डी येथील बालवाडीत परिसरातील आदिवासी मुले काही कारणांनी येत नसत. म्हणून अनुताईंनी ”अंगणवाडी’ ची निर्मिती केली व दुर्गम भागातील मुलांच्या अंगणापर्यंत शिक्षण नेणार्या संकल्पनेचा जन्म झाला. या संस्थेच्या माध्यमातूनच शिक्षणपत्रिका हे मासिक अनेक वर्षे ठाणे जिल्ह्यातून चालवले गेले. ”कोसबाडच्या टेकडीवरून’ हे अनुताई वाघ यांचे आत्मचरित्रपर पुस्तक या परिसराशी जोडलेले आहे.
Leave a Reply