रोजगाराकरता मुंबईत अनेक लोकांचे स्थलांतर झाले आहे अणि सतत होत असते. शहरात ६८% हिंदू, १७% मुस्लिम, ४% ख्रिस्ती व ४% बौद्ध अशी लोकसंख्या आहे. बाकी लोक पारशी, जैन, ज्यू, शीख इत्यादी आहेत. मुंबईत प्रामुख्याने मराठी भाषा बोलली जात असून हिंदी, इंग्रजी, कोकणी या भाषादेखील बोलल्या जातात. विकसनशील देशांतील इतर मोठ्या शहरांप्रमाणे मुंबईतदेखील अतिनागरीकरणामुळे गरीबी, निकृष्ट सार्वजनिक आरोग्य, बेरोजगारी, पायाभूत नागरी सुविधांचा अभाव, अतिस्थलांतरण व बकालवस्त्यांची / झोपडपट्ट्यांची वाढ असे प्रश्न निर्माण झाले आहेत. मुंबईतील धारावी झोपडपट्टी हि आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी आहे. मुंबईकर सामाजिक कार्यांना कमी वेळ देत असले तरी सण-उत्सव आनंदाने साजरे केले जातात. मुंबईच्या खाद्यसंस्कृतीत वडापाव या खाद्यपदार्थाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे! पाणीपुरी, पावभाजी, भेळपुरी, दक्षिण भारतीय, पंजाबी, चायनीज पदार्थदेखील मुंबईकरांच्या विशेष पसंतीचे आहेत.
Leave a Reply