सांगली जिल्ह्यातील लोकजीवन

जिल्ह्यात जागोजागी भिन्नभिन्न भौगोलिक, आर्थिक व सामाजिक स्थिती आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ हे कायम दुष्काळी तालुके आहेत. पलूस, वाळवा, मिरज तालुक्यांतील अनेक गावांना कायम पुराचा धोका असतो. शिराळा, कडेगाव, खानापूर हे डोंगरी तालुके आहेत. एका टोकाच्या शिराळा तालुक्यात जंगल आहे. तर दुसरीकडे जत तालुक्यात मैलोनमैल ओसाड जमीन आहे. सांगली शहराशेजारील हरिपूर आणि सांगलवाडी येथील शेतात चर किंवा मोठमोठे खड्डे खणून त्यात हळद साठविण्याची पद्धत आहे. कदाचित देशातील शेतमाल साठविण्याची अशा प्रकारची एकमेव पद्धत असावी. मराठी माणसाच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असणार्‍या मराठी नाटकाची सुरुवात सांगली येथून झाली, हे या जिल्ह्याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. १८४३ मध्ये श्री. विष्णुदास भावे यांनी सांगली येथे मराठी नाटक सादर करण्यास प्रारंभ केला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*