जिल्ह्याची सीमा कर्नाटकला जोडलेली असल्यामुळे व मराठवाड्यास आंध्रप्रदेश जवळ असल्याने या जिल्ह्यात मराठीसह कन्नड व तेलगू या भाषाही बोलल्या जातात. मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणार्या या जिल्ह्याला धार्मिक स्थळांमुळे वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. ३० सप्टेंबर, १९९३ ला पहाटे झालेल्या भूकंपामुळे लातूरसह याही जिल्ह्याचे प्रचंड नुकसान झाले, पण आता हा जिल्हा त्या धक्क्यातून सावरला असून प्रगतीकडे वाटचाल करत आहे.
Leave a Reply