गॅबन

गॅबनचे प्रजासत्ताक हा पश्चिम मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. गॅबनच्या पूर्व व दक्षिणेला काँगोचे प्रजासत्ताक, ईशान्येला इक्वेटोरियल गिनी व उत्तरेला कामेरून हे देश, तर पश्चिमेला अटलांटिक महासागराचा गिनीचे आखात हा उपसमुद्र आहे. लिब्रेव्हिल ही गॅबनची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी गॅबन ही फ्रान्सची वसाहत होती. मुबलक नैसर्गिक संपत्ती व कमी लोकसंख्या ह्या कारणांमुळे गॅबन हा मध्य आफ्रिकेतील सर्वांत समृद्ध देश आहे.

राजधानी व सर्वात मोठे शहर :लिब्रेव्हिल
अधिकृत भाषा :फ्रेंच
स्वातंत्र्य दिवस :१७ ऑगस्ट १९६० (फ्रान्सपासून)
राष्ट्रीय चलन :मध्य आफ्रिकन सीएफए फ्रँक

( Source : Wikipedia )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*