कर्नाटक राज्यातील गदग आणि बेटागेरी या दोन शहरांची मिळून एकच महापालिका बनविण्यात आली आहे. याच शहरात गदग जिल्ह्याचे मुख्यालयही आहे.
गुती-वास्को महामार्गावर असणारे हे दुहेरी शहर हुबळीपासून ६० किलोमीटर अंतरावर आहे. दक्षिण-पश्चिम रेल्वेचे गदग हे महत्वाचे जंक्शन असून हुबळी-होस्पेटगुंटुकल लाईनवर ते आहे.
मंदिरांचे शहर
गदग-बेटागेरी या शहरांत अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. येथील त्रिकुटेश्वर महामंदिरात शिव,ब्रम्हा आणि सूर्य यांची स्वतंत्र मंदिरे असून, चालुक्यकालीन शिल्पकलेचे सैादर्य येथे पाहायला मिळते. येथील प्राणिसंग्रहालयही खूपच प्रसिध्द असून ते पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात.
Leave a Reply