प्राचीन काळात गडचिरोली परिसर नाग व माणवंशीय राजांच्या अधिपत्याखाली होता. सध्याच्या आरमोरी तालुक्यातील वैरागड व धानोरी तालुक्यातील टिपागड ही पूर्वीच्या काळातील राजवटींची प्रमुख केंद्रे होती. नागवंशीय, गोंड, माणवंशीय यांच्यासह राष्ट्रकूट, यादव व चालुक्य राजांचीही सत्ता चंद्रपूर – गडचिरोली भागांवर होती. १३ व्या शतकात खांडक्य बल्लाळ शाह या राजाने चंद्रपूरची स्थापना केली.
विविध काळांतील विविध राजवटींनंतर १८५३ पर्यंत हा भाग मराठ्यांच्या अधिपत्याखाली होता. १८५४ मध्ये चंद्रपूर- गडचिरोली हा भाग बेरार प्रांतात होता. याचवेळी चंद्रपूर हा स्वतंत्र जिल्हा अस्तित्वात आला. १९०५ मध्ये ‘गडचिरोली’ हा स्वतंत्र तालुका ब्रिटिशांनी निर्माण केला. पुढील काळात प्रशासकीय सोयींसाठी गडचिरोली हा स्वतंत्र जिल्हाच अस्तित्वात आला.
Leave a Reply