गडचिरोली जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

जिल्ह्यात सुमारे १५ टक्के भाग लागवडीखाली आहे. एकूण १६,८९०० हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी ११,३९०० जिरायती, तर उर्वरीत म्हणजे ५५००० हेक्टर बागायती आहे. तांदूळ हे येथील प्रमुख शेती-उत्पन्न आहे तर ज्वारी, तेलबिया, तुर, गहू ही पीके देखील घेतली जातात. लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी, कुरखेडा व धानोरा हे तालुके भाताच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.
जिल्हा बांबू व तेंदू पानांसाठी प्रसिद्ध आहे. त्याच बरोबर ऊस, तंबाखू व शिंगाड्याचे उत्पादनही जिल्ह्यात घेतले जाते. आंबा, सीताफळ, काजू, पेरू, जांभूळ ही फळेही जिल्ह्यात काही प्रमाणात पिकवली जातात. आरमोरी, कुरखेडा व कोरची भागात प्रामुख्याने आंबा घेतला जातो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*