डॉ. प्रकाश आमटे व त्यांच्या पत्नी सौ मंदा आमटे – आदरणीय बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून उभा राहिलेला लोकबिरादरी प्रकल्प. डॉ. प्रकाश आमटे व त्यांच्या पत्नी सौ मंदा आमटे हे हा प्रकल्प हेमलकसामधील नागेपल्ली, भामरागड येथे गेली ३५ वर्षे चालवत आहेत. त्यामुळे गडचिरोली हा जिल्हा आमटे कुटंबियांची कर्मभूमीच आहे असे म्हटल्यास काही वावगे ठरणार नाही.
डॉ. अभय बंग व त्यांची पत्नी डॉ. राणी बंग – या डॉक्टर दाम्पत्याची कर्मभूमीही गडचिरोली जिल्हाच. महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते डॉ. अभय बंग व त्यांची पत्नी डॉ. राणी बंग यांनी शोधग्रामच्या माध्यमातून गडचिरोली येथे प्रकल्प उभा केला आहे. शोधग्राममध्ये ग्रामीण रुग्णालय, व्यसनमुक्ती केंद्र असून आरोग्याबद्दल संशोधनही येथे चालते. त्याचबरोबर सामाजिक जाणीवेतून अनेक दर्जेदार कर्तृत्व ते येथे पार पाडत आहेत.
Leave a Reply