मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले हे शहर आहे. मुंबईचे एकूण क्षेत्रफळ ६०३.४ चौरस किलोमीटर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनार्यावर वसलेले आहे. मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. मुंबईचा मोठा भाग हा समुद्रसपाटीच्या पातळीत आहे. जमिनीची उंची सरासरी १० ते १५ मी. आहे. उत्तर मुंबईचा भूभाग डोंगराळ आहे. मुंबईतील सर्वांत उंच भूभाग हा ४५० मी. (१,४५० फूट) आहे. मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा असे मुंबईचे दोन वेगवेगळे भाग आहेत.
Leave a Reply