ठाणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९५५८ कि.मी. इतके आहे. २०११ च्या गणनेनुसार ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या १,१०,५४,१३१ इतकी आहे. ठाणे जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे तर उत्तरेस गुजरात, वलसाड जिल्हा आहे. ठाणे जिल्ह्याच्या पूर्वेस अहमदनगर जिल्हा व नाशिक जिल्हा तर दक्षिणेस रायगड व मुंबई हे जिल्हे आहेत. ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहर हे मुंबईच्या उत्तरेस वसलेले आहे. ठाणे शहराला तळ्यांचे शहर असेही म्हटले जाते.
Leave a Reply