उस्मानाबाद जिल्हा हा महाराष्ट्रातील मराठवाड्यातला एक जिल्हा आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७५१२ कि.मी2 आहे. त्यातील २४१ कि.मी2 भाग हा शहरी आहे. उस्मानाबाद जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १४,८६,५८६(इ.स.२००१ च्या गणनेनुसार) इतकी असून त्यातील १५.६९ % शहरी आहे. हा जिल्हा समुद्रसपाटीपासून ६०० मी. उंचीवर असून पूर्णपणे दख्खनच्या पठारात येतो. ह्या जिल्ह्यात मांजरा आणि तेरणा नद्यांची पात्रे येतात. उस्मानाबादच्या नैर्ऋत्येला सोलापूर जिल्हा, वायव्येला अहमदनगर जिल्हा, उत्तरेला बीड जिल्हा, पूर्वेला लातूर जिल्हा, व दक्षिणेला कर्नाटकातील बिदर व गुलबर्गा हे जिल्हे आहेत. ज्वारी, सूर्यफूल, हायब्रीड ज्वारी, तुरी, ऊस, कापूस, गहू आणि हरभरा ही मुख्य पिके आहेत.
Leave a Reply