घाना हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. घानाच्या पश्चिमेला कोट दि आईव्होर, उत्तरेला बर्किना फासो व पूर्वेला टोगो हे देश तर दक्षिणेला गिनीचे आखात आहे. आक्रा ही घानाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
१५ व्या शतकात युरोपीय शोधक दाखल होण्याआधी येथे स्थानिक जमातींचे राज्य होते. १८७४ साली ब्रिटिशांनी येथे वसाहत स्थापन केली व येथील सोन्याच्या मुबलक साठ्यांमुळे ह्याचे नाव गोल्ड कोस्ट असे ठेवले. गोल्ड कोस्टला १९५७ साली स्वातंत्र्य मिळाले व घाना देशाची निर्मिती झाली.
सध्या घाना संयुक्त राष्ट्रे, राष्ट्रकुल परिषद, आफ्रिकन संघ इत्यादी आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे. आफ्रिका खंडात सुवर्ण उत्पादनात दक्षिण आफ्रिकेखालोखाल घानाचा दुसरा क्रमांक लागतो. कोकोच्या उत्पादनात देखील घाना जगात अग्रेसर आहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर :आक्रा
अधिकृत भाषा :इंग्लिश
स्वातंत्र्य दिवस :मार्च ६, १९५७ (युनायटेड किंग्डमपासून)
राष्ट्रीय चलन :घाना सेडी (GHC)
( Source : Wikipedia )
Leave a Reply