आसाम राज्यातील जिल्हामुख्यालय असलेले शहर गोलाघाट. १५ ऑगस्ट १९८७ रोजी गोलाघाट जिल्ह्याची स्थापना झाली. ब्रिटिश काळात १८४६ पासून गोलाघाट हा उपविभाग होता. १८७६ पासून या शहरात पोस्ट आणि टेलिग्राफ सर्व्हिस सुरु झाली. समुद्रसपाटीपासून ३१२ फूट उंचीवर हे शहर असून धनसिरी नावाच्या नदीच्या किनार्यावर ते वसलेले आहे.
गोलाघाट शहरातील साहित्यिक इतिहास –
गोलाघाट साहित्य सभा ही आसाम साहित्य सभेची सर्वांत जुनी शाखा असून, १९१८ साली तिची स्थापना झालेली आहे. अनेक नामवंत साहित्यिक या सभेचे सभासद आहेत. या शहरात राज्यातील सर्वात जुने रेल्वेस्थानक असून, देशाच्या स्वतंत्र्यसंग्रामात येथील अनेक देशभक्तांनी योगदान दिले आहे.
Leave a Reply