मुंबई-कोलकाता या राष्ट्रीय महामार्ग क्र.६ या शहराजवळून जात असल्यामुळे दळणवळणाच्या पुष्कळ सोयी गोंदिया शहरात उपलब्ध झाल्या. गोंदिया या शहराचे वैशिष्टय म्हणजे, हे शहर इंग्रजांनी सुरू केलेल्या मुंबई-कोलकाता या पश्चिम-पूर्व महत्त्वाच्या रेल्वे लाईनवर आहे. त्यामुळे या शहराची दोन भागात विभागणी होते. गोंदियाजवळचे बिरसी येथील छोटे विमानतळ स्वातंत्र्यापूर्वीपासून कार्यरत होते.
इंग्रजांनी त्यांच्या सोयीसाठी या धावपट्टीची बांधणी केली. आधी या विमानतळावर फक्त दिवसाच विमाने उतरवता येऊ शकत होती. विमानतळ प्राधीकरण आणि अन्य बाबींमुळे बिरसी विमानतळाचा विकास घडला आहे आणि त्यामुळे अन्य विमानतळाप्रमाणे बिरसी येथे रात्रीसुद्धा विमानाची ये-जा होऊ लागली आहे.
Leave a Reply