गुडूर हे आंध्र प्रदेशातील नेल्लूर जिल्ह्यातील एक मोठे शहर आहे. आंध्र प्रदेशातील सर्वांत जुन्या नगरपालिकांपैकी एक नगरपालिका या शहरात आहे. या शहराभोवतीच्या १००० चौरस किलोमीटर परिसरात अभ्रकाचे मोठे साठे असून, येथील अभ्रक विदेशात निर्यात केले जाते. चोल राजांनी येथे प्रथम अलगंथा स्वामी मंदिराची उभारणी केल्यानंतर सभोवती वस्ती वाढत हे शहर वसले.
विषम हवामानाचे शहर
गुडुर हे विषम हवामानाचे शहर आहे. उन्हाळ्यात येथे खूप उष्मा असतो. बऱ्याचदा या परिसरात वादळेही होतात. हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात थंडी, तर पावसाळ्यात पूरस्थिती असते. पर्यटकांनी ऑक्टोबर ते मार्च या काळात येथे भेट देणे चांगले.
Leave a Reply