गिनी-बिसाउ

गिनी-बिसाउचे प्रजासत्ताक हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. गिनी-बिसाउच्या उत्तरेस सेनेगाल, दक्षिण व पूर्वेस गिनी तर पश्चिमेस अटलांटिक महासागर आहेत. बिसाउ ही ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

ऐतिहासिक काळात मालीच्या साम्राज्याचा भाग असणारा गिनी-बिसाउ १९व्या शतकापासून पोर्तुगीजांची एक वसाहत होता. १९७४ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ह्या देशाचे नाव गिनी ठेवण्यात आले व शेजारील गिनी देशापासून वेगळेपण राखण्यासाठी ह्या देशाच्या नावामध्ये बिसाउ हे राजधानीचे नाव जोडण्यात आले. स्वातंत्र्यानंतर गिनी-बिसाउचे राजकीय अस्तित्व अस्थिर राहिले आहे. लोकशाहीवादी सरकारे येथे सर्रास उलथवून टाकण्यात आली आहेत व लष्करी राजवट अनेकदा स्थापित केली गेली आहे. १२ एप्रिल २०१२ रोजी येथील लष्करी अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा सत्ता हातात घेतली व विद्यमान राष्ट्राध्यक्ष व उमेदवारांना कैद केले.

इतर बहुतांशी आफ्रिकन देशांप्रमाणे गिनी-बिसाउ गरीब व अविकसित आहे. मानवी विकास सूचक व दरडोई उत्पनामध्ये गिनी-बिसाउ जगात सर्वांत खालच्या क्रमांकांपैकी एक आहे. येथील राजकीय भाषा पोर्तुगीज असली तरीही केवळ १४ टक्के जनता पोर्तुगीज वापरते.

राजधानी व सर्वात मोठे शहर :बिसाउ
अधिकृत भाषा :पोर्तुगीज
स्वातंत्र्य दिवस :२४ सप्टेंबर १९७३ (पोर्तुगालपासून)
राष्ट्रीय चलन :पश्चिम आफ्रिकन सीएफए फ्रँक

( Source : Wikipedia )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*