गुंटकल हे आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर आंध्र प्रदेशात असले, तरी कर्नाटकातील बेल्लारीपासून अवघ्या ५० किलोमीटरवर आहे. या शहरात रेल्वेचे डिझेल इंजिन वर्क्सशॉप असून, गुंटकल डिव्हिजन ही रेल्वेची एक फायदेशीर डिव्हिजन आहे. उत्तर आणि दक्षिण भारतातील शहरे गुंटकल जंक्शनमुळे जोडली गेली आहेत.
गुंटकल्लूचे झाले गुंटकल
गुंटकल्लू या शब्दाचा अपभ्रंश होऊन सध्याचे गुंटकल हे नाव पडलेले आहे. संस्कृतमध्ये कल्लू या शब्दाचा अर्थ शिवलिंग असा होतो. येथे तेलगूबरोबरच काही प्रमाणात कन्नड भाषाही बोलली जाते. येथील अंजनय्या स्वामी मंदिर देशभर प्रसिद्ध आहे
Leave a Reply