गुंटूर हे आंध्र प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर असून, हैदराबादपासून २६६ कि.मी.वर वसलेले आहे. गुंटूर जिल्ह्याचे मुख्यालय या शहरात असून, येथील अमरावती, उडवल्ली गुहा, कोंडावीड किल्ला आदी स्थळे प्रेक्षणीय आहेत. हे शहर बहुभाषिक असून, येथे तेलगू भाषेबरोबरच उर्दूही मोठ्या प्रमाणात बोलली जाते. हे शहर आंध्र प्रदेशचे टेक्स्टाईल हब म्हणूनही ओळखले जाते.
मिरचीची सर्वांत मोठी बाजारपेठ
गुंटूर हे आंध्र प्रदेशातील एक महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र असून, येथे देशातील मिरचीची सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. तसेच येथे तंबाखूचीही मोठी बाजारपेठ असून, टोबॅको बोर्ड ऑफ इंडियाचे मुख्य कार्यालय येथे आहे.
Leave a Reply