हिंगोली हा मराठवाड्यातील एक महत्त्वाचा जिल्हा. हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी हे संत नामदेव महाराजांचे मूळ गाव असून बालपणापासूनच पंढरीच्या विठ्ठलाच्या भक्तीची गोडी लागलेल्या संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून औंढा-नागनाथास जाऊन विठोबा खेचरांकडून गुरूपदेश घेतला.
हिंगोली हा कृषिप्रधान जिल्हा असून या जिल्ह्यात मराठी, हिंदीसह उर्दू भाषाही काही प्रमाणात बोलली जाते. भारतातील प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी आठवे औंढा- नागनाथ हिंगोली जिल्ह्यात आहे.