प्रारंभीच्या काळात मौर्यांच्या अधिपत्याखाली असणारा लातूर हा भाग पुढे सातवाहन, राष्ट्रकूट व यादव घराण्याच्या अंमलाखाली होता. पुढे काही काळ या प्रदेशावर दिल्लीचे सल्तनत, बहामनी राजवट, निजामशाह व आदिलशाह यांनी राज्य केले. मध्यंतरी औरंगजेबाने हा भाग मोगल सत्तेच्या अंमलाखाली आणला. स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळापर्यंत निजामाच्या अखत्यारीत असणारा हा भाग १९४८ मधे तत्कालीन मुंबई प्रांतात समाविष्ट करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचा निर्मितीनंतर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये असणारा लातूरचा भाग १५ ऑगस्ट १९८२ पासून उस्मानाबादपासून वेगळा करण्यात आला आणि अशा प्रकारे स्वतंत्र लातूर जिल्हा अस्तित्वात व नावारुपास आला.
Leave a Reply