सांगली जिल्ह्याला प्राचीन इतिहास लाभला आहे. सांगली जिल्ह्याने मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादव, बहामनी व मराठी आदी सत्तांचा उत्कर्ष व र्हास अनुभवला. पेशवाईच्या काळात सांगली हे स्वतंत्र संस्थान होते. या संस्थानांवर पटवर्धन घराण्याची सत्ता होती. मिरज हेदेखील संस्थान होते. स्वातंत्र्यपूर्व काळात सविनय कायदेभंगाच्या चळवळीत जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील बिळाशी येथे मोठा सत्याग्रह झाला होता. कृष्णेचा रमणीय काठ लाभलेल्या सांगली या गावात सहा गल्ल्या किंवा भाग असल्याने याचे नाव सांगली पडले असे मानले जाते. तसेच कन्नड भाषेतील पूर्वीच्या ‘सांगलकी’ या नावाचे पुढे सांगली असे रुपांतर झाल्याचेही मानले जाते. सुरुवातीला सातारा जिल्ह्याचा भाग असणारा सांगली जिल्हा दिनांक १ ऑगस्ट,१९४९ पासून दक्षिण सातारा म्हणून ओळखला जाऊ लागला, तर २१ नोव्हेंबर, १९६० पासून स्वतंत्र सांगली जिल्हा अस्तित्वात आला.
Leave a Reply