ठाणे जिल्ह्याचा इतिहास हा साधारणपणे चार टप्प्यांमध्ये विभागला जातो. पुरातन काळ-प्रागैतिहासिक काळापासून ते इ.स. १३०० पर्यंत, मुस्लीम राजवटीचा काळ (इ.स. १३०० ते १६६०), मराठ्यांचा काळ (इ.स.१६६०-१८००) व ब्रिटिश काळ (इ.स. १८८०- १९४७). प्राचीन काळापासून येथील सोपारा, कल्याण, ठाणे व संजन ही बंदरे महत्त्वाची आहेत. बौद्ध लिखाणांप्रमाणे सोपारा हे राजधानीचे शहर होते व गौतम बुध्दांच्या काळात व्यापाराचेही प्रमुख ठिकाण होते.
शिलाहार युगात ठाणे शहराचे सुंदर व सुबक शहर असे अरबी खलाशांनी वर्णन केले आहे. शिलाहारांनी उत्तरी कोकणावर सुमारे ४०० वर्षे राज्य केले. त्या काळात वास्तुशिल्प व इतर कलांमध्ये या भागात खूप प्रगती झाली होती. तेराव्या शतकात देवगिरीच्या राजा रामदेव याच्या पुत्राची बिंब राजाची -सत्ता ठाणे परिसरावर होती. माहीम (त्यावेळचे बिंबस्थान) हे त्याच्या राज्याचे प्रमुख केंद्र होते. बिंब राजाचा सैनिकी तळ माहिमजवळच्या भागात होता.
या सैनिकी तळाला ‘स्थानक’ असे म्हणत. या ‘स्थानक’चा पुढे अपभ्रइश होऊन या परिसराला ‘ठाणे’ असे नाव पडले. पश्र्चिम भारताच्या समुद्री व्यापारामध्ये ठाणे अग्रेसर राहण्याचे कारण म्हणजे इथली बंदरे होत.
Leave a Reply