हंगेरी (स्थानिक मॉज्यॉरोर्शाग) हा मध्य युरोपामधील एक भूपरिवेष्टित देश आहे. हंगेरीच्या उत्तरेला स्लोव्हाकिया, पूर्वेला युक्रेन व रोमेनिया, दक्षिणेला सर्बिया व क्रोएशिया, नैऋत्येला स्लोव्हेनिया तर पश्चिमेला ऑस्ट्रिया हे देश स्थित आहेत. बुडापेस्ट ही हंगेरीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
अंदाजे इ.स. च्या नवव्या शतकादरम्यान स्थापन केला गेलेल्या हंगेरीचे रूपांतर इ.स. १००० साली पहिल्या स्टीफनने राजतंत्रामध्ये केले. इ.स. १५४१ ते १६९९ दरम्यान हंगेरी ओस्मानी साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता. १८६७ ते १९१८ सालांदरम्यान ऑस्ट्रिया-हंगेरी हे एक बालाढ्य राष्ट्र अस्तित्वात होते. पहिल्या महायुद्धामध्ये पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रिया-हंगेरीचे विघटन झाले व आजचा हंगेरी देश निर्माण झाला. पहिल्या महायुद्धामध्ये अक्ष राष्ट्रांच्या बाजूने लढणाऱ्या हंगेरीने महायुद्ध संपल्यानंतर कम्युनिस्ट राजवटीचा स्वीकार केला. १९८९ साली हंगेरीमध्ये साम्यवादाचा अस्त झाला व संसदीय प्रजासत्ताक पद्धती चालू झाली.
सध्या प्रगत देशांपैकी एक असलेला हंगेरी संयुक्त राष्ट्रे, युरोपियन संघ, नाटो, आर्थिक सहयोग व विकास संघटना इत्यादी महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर :बुडापेस्ट
अधिकृत भाषा :हंगेरियन
स्वातंत्र्य दिवस :23 ऑक्टोबर 1989
राष्ट्रीय चलन :हंगेरियन फोरिंट (HUF)
( Source : Wikipedia )
Leave a Reply