आइसलंड

आइसलंड हा उत्तर युरोपातील उत्तर अटलांटिक महासागरात वसलेला एक द्वीप-देश आहे. याचे क्षेत्रफळ साधारणपणे १ लक्ष चौरस मैल क्षेत्रफळ आहे. रेयक्यविक ही आइसलंडची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. यापेक्षा लहान दुसरे गाव अकुरेरी (Akureiri) आहे. हे उत्तरेकडे आहे. येथे प्रमुख आकर्षण असे गरम पाण्याचे झरे हे रेकयाविकपासून २० मैलावर आहेत.

आकाश बहुतेक वेळा ढगाळ असते. हा देश अत्यंत उत्तरेला असला तरीही अटलांटिक महासागरातील प्रभावशाली व कोमट खाडी प्रवाहामुळे आइसलंडमधील हवामान तुलनेत उबदार राहिले आहे.

ऐयाफ्यथ्लायोकुथ्ल (Eyjafjallajokull) नावाचा ज्वालामुखी येथे आहे. आइसलंडमध्ये अनेक सुप्त आणि जागृत ज्वालामुखी आहेत.

शेवटचे हिमयुगाचे अखेरचे अवशेष अजूनहि आइसलंडमध्ये शिल्लक आहेत. थिंगवेथ्लिर (Þingvellir) येथे नॉर्वेच्या राजापासून स्वत:ची सुटका करू पाहणार्‍या आणि शेती आणि पशुपालनासाठी नव्या जागा शोधणार्‍या वायकिंग लोकांनी ९व्या शतकात प्रवेश केला. इ.स. १२६२ साली नॉर्वेचे राज्य आइसलँड वर सुरू झाले. कालान्तराने नॉर्वेची जागा डेन्मार्कने घेतली आणि डॅनिश सत्तेखाली आइसलंड इ.स. १९४४ सालापर्यंत राहिला. इ.स. १९४४ साली परस्परसंमतीने आइसलंड स्वतंत्र देश झाला. या घटनेची घोषणा थिंगवेथ्लिर (Þingvellir) येथे करण्यात आली होती. रेकयाविक शहरामध्ये आइसलंड देशाचे राष्ट्रीय संग्रहालय आहे.

राजधानी व सर्वात मोठे शहर : रेयक्यविक
अधिकृत भाषा : आइसलंडिक
स्वातंत्र्य दिवस :१ फेब्रुवारी १९०४
राष्ट्रीय चलन : आइसलॅंडिक क्रोना

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*