MENU

इंडोनेशिया

इंडोनेशिया (अधिकृत नाव: Republik Indonesia; इंडोनेशियाचे प्रजासत्ताक) हा आग्नेय आशिया व ओशनियामधील एक देश आहे. हा देश हिंदी महासागरामध्ये एकूण १७,५०८ बेटांवर वसला आहे. बोर्नियो, जावा, सुमात्रा, सुलावेसी, तिमोर व न्यू गिनी ही येथील प्रमुख बेटे आहेत. इंडोनेशियाची लोकसंख्या सुमारे २३ कोटी असून जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या ह्याच देशात आहे. संस्कृतमध्ये या देशाचे नाव दीपांतर आहे..

हा देश साडेतीनशे वर्षे डच अधिपत्याखाली होता. मात्र दुसर्‍या महायुद्धानंतर इंडोनेशिया स्वतंत्र झाला.

जकार्ता ही देशाची राजधानी आहे. येथील मुख्य भाषा बहासा इंडोनेशिया आहे. हिच्याखेरीज बासा जावा, बासा बाली, बासा सुंडा, बासा मादुरा इत्यादी अनेक भाषा येथे आहेत. येथे कावी नावाची एक प्राचीन भाषा आहे. येथील प्रमुख साहित्यिक ग्रंथ याच भाषेत आहेत. कावी भाषेतील भिन्नेक तुंग्गल इक – विभिन्नतेत एकता – हे या देशाचे घोषवाक्य आहे.

इंडोनेशियामध्ये जगातली एक सर्वांत मोठी जैविक विविधता आहे. आसियान व जी-२० ह्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा इंडोनेशिया हा सदस्य देश आहे.

जीवाश्म अवशेषांवरून काढलेल्या निष्कर्षानुसार येथे पाच लाख वर्षांपूर्वीचा आदिमानव सापडतो. याला जावा पुरुष (इंग्रजी: Java Man) म्हणून ओळखले जाते. सुमारे २००० वर्षापूर्वी येथे पूर्वेकडील देशांमधून म्हणजे तैवानमधून लोक आले व त्यांनी हा भागा ताब्यात घेतला, असे मानणारा एक प्रवाह आहे.. त्यानंतर त्यांनी भातशेती व इतर कलाकौशल्ये मिळवली. भारत व चीन या दोन्ही देशांशी असलेल्या व्यापाराने या देशाची संस्कृतीला आकार दिला. सातव्या शतकात श्रीविजय या नाविक प्रबळ असलेल्या राजाने हिंदू तसेच बौद्ध धर्म यांना स्थान दिले. त्यानंतर शैलेंद्र व मातारम यांनी अनुक्रमे बोरोबदूर व प्रंबनन ही धार्मिक शहरे वसवली. मजापहित हे हिंदू राजघराणे तेराव्या शतकात जावा बेटावर सत्तेत आले. हा काळ इंडोनेशियाच्या इतिहासातले सुवर्णयुग म्हणून ओळखला जातो. मात्र त्या नंतर मुसलमान व्यापारी व्यापाराच्या उद्देशाने येथे आले हळूहळू जम बसवत त्यांनी सुमात्रा बेटावर ठाणे वसवले. येथून इंडोनेशियाच्या मुसलमानीकरणाला सुरुवात झाली. सोळाव्या शतकापर्यंत बहुतेक भाग मुसलमान झाले होते.

इ.स. १५२१ मध्ये येथे पहिल्यांदा युरोप खंडातून पोर्तुगीज लोक आले. त्यांना येथील मसाल्याचे पदार्थ हवे होते. त्यानंतर ब्रिटिश व डच आले. डच लोकांनी डच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करून येथे अंमल बसवला. इ.स. १८०० मध्ये त्यांनी इंडोनेशियाला आपली वसाहत म्हणून घोषित केले.

दुसर्‍या महायुद्धात जपानी आक्रमण पाहिल्यानंतर स्वातंत्र्याच्या भावनेने येथे मूळ धरले. जपानच्या शरणागतीनंतर इ.स. १९४५ मध्ये सुकार्नो यांनी अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतली. पण नेदरलँड्सने आपला अंमल कायम ठेवण्याची धडपड सोडली नाही. शेवटी डिसेंबर इ.स. १९४९ मध्ये इंडोनेशियाने स्वातंत्र्य मिळवले.

राजधानी व सर्वात मोठे शहर : जकार्ता
अधिकृत भाषा : बहासा इंडोनेशिया
स्वातंत्र्य दिवस :डिसेंबर २७, १९४९ (मान्यता)
राष्ट्रीय चलन : इंडोनेशियन रुपिया (IDR)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*