अकोला जिल्ह्यात शेतीबरोबरच नव्याने औद्योगिक वसाहती आल्याने इतर व्यवसायाच्या व रोजगाराच्या संधीही उपलब्ध होत आहेत. जिल्ह्यात अकोला, आकोट, बाळापूर, तेल्हारा व मूर्तिजापूर याठिकाणी छोट्या-मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत.
जिल्ह्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जात असल्यामुळे कापसावर आधारित उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर आहेत. तसेच यंत्रमाग, हातमाग, सूतगिरण्या या उद्योगांमुळे ह्या जिल्ह्यात अनेकांच्या उपजिविकेचं साधन बनलं आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी जिनिंग-प्रेसिंग मिल्स आहेत. आकोट येथील सतरंज्या विशेष प्रसिध्द आहेत. अकोला येथे खादीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. पातुर तालुक्यात चंदनाचे व सागाचे लाकूड मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.
कृषी उत्पन्नावर आधारित काही उद्योगही जिल्ह्यात आहेत. बार्शी-टाकळी तालुक्यात वनस्पती तूप, डाळ मिल व तेल गिरण्याही आहेत. जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पारसचे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र प्रसिद्ध असून त्याची क्षमता ६२.५ मेगावॅट आहे.
Leave a Reply