
इराण हा मध्यपूर्वेतील एक देश आहे. इराण चे पूर्वीचे नाव पर्शिया असे होते. पर्शियन संस्कृती जगातील सर्वात प्राचीन संस्कृतीपैकी एक आहे. खनिज तेल साठयात संपूर्ण जगात क्रमांक तिसरा तर वायुसाठ्यात दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. इराकविरुद्ध ९ वर्षे चाललेले युद्ध यादेशाने केले.
मोहम्मद मोसादिक यांच्या नेतृत्वाखाली , १९५३ साली लोकशाहीवादी चळवळ दडपली गेली यामध्ये अमेरिकेच्या सी आय ए चा हात होता असे मानतात कारण त्यांना इंग्लंड व अमेरिकेचे संबंध जपायचे होते. १९७९ मध्ये इराणमध्ये इस्लामी क्रांती घडवून शहा रेझा पहलवी यांना पदच्युत केले गेले त्यानंतर अयातुल्ला खोमेनी इराण मध्ये परतले. त्यांनी इराणचे कट्टर इस्लामीकरण केले.
पारशी – इराण मध्ये अरब मुस्लिमांनी आक्रमण केल्यावर झरत्रुष्ट्र धर्म मानणार्यांचा एक गट तिथून इ.स ८०० च्या दरम्यान निसटला. या गत तेथून भारतात येऊन गुजरात राज्यात वसला. यांनाच आजच्या काळात पारशी असे म्हणतात. या शिवायही इराण येथील याझ्द प्रांतात झरत्रुष्ट्र धर्म मानणारे काही टिकून राहिले. सतराव्या शतकात उरल्यासुरल्या पारशी लोकांचा कट्टर मुस्लिमांकडून छळ सुरु झाला. सुमारे १८५० नंतर यातील अजून काही लोक भारतात आले. त्यांना इराणी म्हणतात. मुंबई येथील अनेक इराणी उपहारगृहे हीच मंडळी चालवीत असत.
इराणचा प्रसिद्ध कवी फिरदौसी हा होय.
इराण मध्ये मोठ्या प्रमाणात खनिज तेल असल्याने अनेक राष्ट्रांना इरानच्या राजकारणात रस आहे. हे तेल इराण आपल्याला आणि आपण सांगू त्याच भावात विकावे यासाठी मोठा आंतराष्ट्रीय दबाव इराणवर टाकण्यात येत असतो. अणु कार्यक्रमाची सुरुवात केल्याने. इराणवर अमेरिका व इतर राष्ट्रांनी निर्बंध लादले आहेत. परंतु भारत मात्र येथील नैसर्गिक वायू पाईपलाईन द्वारे मिळवत आहे. त्यासाठीचे मूल्य रुपयात अदा करता येईल अशी व्यापारी रचनाही आता अस्तित्वात आणण्यात आली आहे. इराणमध्ये केशराचे उत्पादनही होते. इराण मध्ये पिकणारे केशर हे स्वाद आणि रंगात अव्वल मानले जाते.
राजधानी व सर्वात मोठे शहर : तेहरान
अधिकृत भाषा : फारसी
स्वातंत्र्य दिवस :(इराणी राजसत्ता उलथून क्रांती)
फेब्रुवारी ११, १९७९ (घोषित)
राष्ट्रीय चलन : इराणी रियाल (IRR)
Leave a Reply