जगत्याल हे आंध्र प्रदेशातल्या करीमनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, चार मोठे तलाव या शहराभोवती आहेत. त्यातील तीन तलावांचे पाणी हे शेतीसाठी वापरले जाते, तर एका तलावाचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. हैदराबाद व शमशाबाद येथून जगत्याल येथे बसने जाता येते. तेलगू आणि उर्दू या दोन भाषा येथे बोलल्या जातात. या शहरात शेतमालाची मोठी बाजारपेठ आहे.
नावाचा रंजक इतिहास
येथील संस्थानिक इब्राहिम धमसा यांनी दोन फ्रेंच इंजिनिअर जॅक आणि ताल यांच्याकडून येथील किल्ल्याचे काम करवून घेतले. त्यामुळेच शहराला ‘जॅकताल’ असे नाव पडले. अपभ्रंशाने पुढे त्याचे नाव ‘जगत्याल’ असे झाले.
Leave a Reply