
जालना हे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. पूर्वी जालना हा औंरगाबाद जिल्ह्याचाच एक भाग होता. १ मे १९८२ रोजी जालना जिल्हा वेगळा करण्यात आला. हे शहर कुंडलिका नदीच्या किनार्यावर वसलेले असून, येथे दक्षिण मध्य रेल्वेचे स्थानक आहे. इथला मोती तलाव प्रसिध्द आहे.