जमैका

Jamaica

क्रिकेटमध्ये जमैका हा शब्द आपण बर्‍याचदा ऐकतो.  वेस्ट इंडिजमधील हा एक छोटासा भाग.

ख्रिस्तोफर कोलंबसने १४९४ मध्ये जमैकावर पाय ठेवला.

१६०० मध्ये स्पेनने येथे वसाहत स्थापन केली. मात्र १६६५ मध्ये त्यांनी येथील ताबा सोडला.

१८व्या शतकापर्यंत जमैका गुलाम मजुरांमुळे साखर उत्पादनात अग्रेसर होता. १८३० मध्ये येथील गुलामी पध्दती कोसळली. १९५९ मध्ये जमैका पूर्ण स्वायत्त झाला व त्याला राज्याचे स्वरुप प्राप्त झाले.

१९६२ मध्ये ब्रिटिश राष्ट्रकुल अंतर्गत जमैकाला पूर्ण स्वातंत्र्य प्राप्त झाले. सध्या येथे राजेशाही प्रणाली असून, व्दिसदनीय संसद आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*