जमैका

जमैकाचे राष्ट्रकुल हा कॅरिबियनच्या ग्रेटर अँटिल्स भौगोलिक प्रदेशामधील एक लहान द्वीप देश आहे. जमैका कॅरिबियन समुद्रामध्ये क्युबाच्या १४५ किमी दक्षिणेस व हिस्पॅनियोलाच्या १८१ किमी पश्चिमेस वसला असून तो कॅरिबियनमधील पाचव्या क्रमांकाचा मोठा देश आहे. आहे. २०१२ साली सुमारे २९ लाख लोकसंख्या असलेला जमैका ह्या बाबतीत अमेरिका व कॅनडा खालोखाल अमेरिका खंडामधील तिसऱ्या क्रमांकाचा इंग्लिश भाषिक देश आहे. किंग्स्टन ही जमैकाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

१६५५ सालापासून ब्रिटिश वसाहत असलेल्या जमैकाला ६ ऑगस्ट १९६२ रोजी स्वातंत्र्य मिळाले. सध्या जमैका राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असून येथे युनायटेड किंग्डमच्या राणीची औपचारिक सत्ता आहे.

राजधानी व सर्वात मोठे शहर :किंग्स्टन
अधिकृत भाषा :इंग्लिश
स्वातंत्र्य दिवस :६ ऑगस्ट १९६२ (युनायटेड किंग्डमपासून)
राष्ट्रीय चलन :जमैकन डॉलर

सौजन्य : विकिपीडिया

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*