मध्य प्रदेशातील झांशी हे एक ऐतिहासिक शहर आहे. ‘मेरी झांशी नही दुंगी’ अशी गर्जना करुन इंग्रज राजवटीसोबत करारी झुंज दिल्यामुळे आजही झांशीला राणी लक्ष्मीबाईची झांशी म्हणूनच ओळखले जाते. इंग्रजासोबत लढताना तिने आपल्या तानुल्ह्यास पाठीला बांधले व रणांगणात उतरली होती. इंग्रज फौजेसोबत दोन हात करुन स्त्री शक्तीचा परिचय राणी लक्ष्मीबाईनी दिला.
ब्रिटिशांनी राणी लक्ष्मीबाईचा उल्लेख `’हिंदुस्थानची जोन ऑफ आर्क’ असा केला. क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता ठरलेल्या या राणीवर अनेक काव्ये, पोवाडे रचले गेले.
हे शहर आजही पर्यटकांचे आकर्षणाचे स्थळ आहे.
Leave a Reply