जुन्नर गावातील रविवार पेठेत हे मंदिर आहे. सुमारे ३०० वर्षापूर्वी हे देवस्थान श्री जोशी नांवाच्या गणेशभक्ताच्या भक्तीचे प्रतीक आहे. ते दर संकष्टीला लेण्याद्रीच्या गणपतीच्या दर्शनास जात. पुढे वृध्दापकाळात त्यांना लेण्याद्रीला जाणे शक्य होईना. तेव्हा त्यानी मनोभावे गणेशाची प्रार्थना केली. त्याच रात्री स्वप्नात देवांनी येऊन सांगितले की ‘तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न झालो आहे. तुझ्या मळ्यातच मी अमुक ठिकाणी आहे. माझी तुला मूर्ती सापडेल. तिची प्राणप्रतिष्ठा करून मंदिर बांध. त्याप्रमाणे सकाळी उठून पाहताच त्यांना मळ्यात गणेशमूर्ती मिळाली. तिची स्थापना करून मंदिर बांधले. हा गणेश येथील ग्रामदैवत मानले जाते. ज्यांनी या देवाची सेवा केली त्यांचे कल्याण झाले आहे.
Leave a Reply