कडप्पा

कडप्पा हे आंध्र प्रदेशातील रायलसीमा भागातील एक महत्त्वाचे शहर आहे. वायएसआर जिल्ह्याचे कडप्पा हे मुख्यालय आहे. हैदराबादपासून ४१२ किलोमीटरवर हे शहर असून, पेन्ना नदी या शहरापासून ८ किलोमीटरवरुन वाहते. कडप्पा तिन्ही बाजूंनी नल्लमला आणि पलकोंडा नावाच्या पर्वतांनी वेढलेले आहे. गडप्पा या टोपण नावानेही हे शहर ओळखले जाते. गडप्पा म्हणजे प्रवेशद्वार.

कडप्पाला शेकडो वर्षांचा इतिहास
कडप्पा हे शहर ११व्या शतकापासून १४ व्या शतकापर्यंत चोल साम्राज्याचा एक भाग होते. पुढे ते विजयनगर साम्राज्यात गेले. यानंतर ते निझामाकडे व शेवटी ब्रिटिशांच्या ताब्यात गेले. येथील वीरभद्रस्वामी मंदिर प्रसिद्ध आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*