काकिनाडा हे आंध्र प्रदेशातील एक शहर असून, हे पूर्व गोदावरी जिल्ह्याचे मुख्यालय आहे. हैदराबादपासून ४६५ कि.मी.वर असलेल्या या शहरात दोन मोठे खत प्रकल्प असल्याने या शहराला खत उत्पादक शहर असेही म्हणतात. २०११च्या जनगणनेनुसार काकिनाडा शहर आकारमानाच्या दृष्टीने आंध्र प्रदेशातील सहावे, तर लोकसंख्येच्या दृष्टीने नववे मोठे शहर आहे.
मोठे बंदर
काकिनाडा हे आंध्र प्रदेशातील दुसरे मोठे बंदर आहे. इथे समुद्र किनाऱ्यालगत पाण्याची पातळी खोल असल्याने मोठ्या जहाजांची नेहमी ये-जा असते. देश- विदेशात येथूनच नारळाची निर्यात केली जाते.
Leave a Reply