कल्पेट्टा हे केरळ राज्यातील वायनाड जिल्ह्यातील विथ्री तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हिरव्यागार टेकड्यांमध्ये वसलेल्या या शहरात अनेक चहा आणि कॉफीचे मळे आहेत. समुद्रसपाटीपासून ७८० मीटर उंचीवरचे हे शहर कोझीकोडे ते म्हैसूर या ७६६ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर वसलेले आहे. कोझीकोडेपासून या शहराचे अंतर ७२ किलोमीटर आहे.
पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध
केरळमधील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कल्पेट्टा शहरात व आजूबाजूच्या परिसरात अनेक हॉटेल्स आणि लॉजेस आहेत. येथील महात्मा गांधी मेमोरियल म्युझियम प्रसिद्ध आहे. केरळ दौऱ्यावेळी याच ठिकाणी महात्मा गांधीजी विश्रांती घेत असत.
Leave a Reply