कांचिपुरम हे तमिळनाडू राज्यातील एक महत्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. चेन्नईपासून ७२ किलोमीटर अंतरावर वसलेल्या या शहराने ११.६०५ वर्ग किलोमीटर क्षेत्र व्यापलेला आहे. रस्ते, रेल्वे मार्गानेही हे शहर देशाच्या सर्व भागांशी जोडलेले आहे. हवाईमार्गे जाण्यासाठी चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे या शहराला सर्वात जवलचे विमानतल आहे.
आद्य शंकराचार्यांचे मठ प्रसिध्द
कांचिपुरम हे शहर वेगावती नदीच्या किनार्यावर वसलेले असून येथील आद्य शंकराचार्यांचा मठ तसेच कैलासनाथ मंदिर, वैकुंठ परुमल मंदिर प्रसिध्द आहे. हाताने विणल्या जाणार्या या शहरातील साड्या देशभरात प्रसिध्द असून त्याना मोठी मागणी आहे.
Leave a Reply