कण्णूर हे केरळ राज्यातील एक जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. मलबार विभागातील हे सर्वांत मोठे शहर असून, ब्रिटिश काळात हे शहर कॅनानोर या नावाने ओळखले जात होते. अद्यापही फक्त भारतीय रेल्वेच्या रेकॉर्डवर या शहराचे नाव कॅनानोर असेच आहे. त्रिवेंद्रमपासून ५१८ किलोमीटर ते वसलेले असून, देशाच्या विविध भागांशी महामार्गाने जोडलेले आहे.
हातमाग व्यवसायासाठी प्रसिद्ध
कण्णूर हे हातमाग व्यवसायासाठी देशभर प्रसिद्ध आहे. हातमागावर तयार झालेले व उत्कृष्ट कलाकुसर असलेले सुंदर कापड येथे तयार होते. देशाच्या विविध भागांत ते विक्रीसाठी पाठविले जाते. विदेशातही काही प्रमाणात या कापडाची निर्यात होते.
Leave a Reply