
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे.
सातवाहनकालीन वसाहत, बौध्द लेण्या, कुरुवंशाची नाणी येथील उत्खनात आढळल्या आहेत.
बहामनी काळातील गढीसाठीही कर्हाड प्रसिध्द आहे. या गढीत नकट्या रावळाची विहीर तसेच सुलतान अली आदिलशहा यांनी इ.स.१५५७ ते १५८० बांधलेली मशीद आहे.
Leave a Reply