कोची हे केरळ राज्यातील एर्नाकुलम जिल्ह्यातील एक मोठे शहर आहे. या शहराला अरबी समुद्राचा मोठा किनारा लाभलेला असून, येथे मोठे बंदर आहे. केरळ राज्यातील ते सर्वाधिक लोकसंख्येचे शहर असून, भारत सरकारने ‘बी १ ग्रेड’च्या शहरांच्या यादीत या शहराचा समावेश केलेला आहे. ‘अरबी समुद्राची राणी’, असेही या शहराला म्हटले जाते.
युरोपियनांची पहिली वसाहत
इ.स. १५०३ मध्ये या शहरावर प्रथम पोर्तुगिजांची सत्ता आली. युरोपियन लोकांची भारतातील ही पहिली वसाहत होती. कालांतराने हे शहर डच व ब्रिटिशांकडेही काही काळ होते. केरळला येणाऱ्या देशी, विदेशी पर्यटकांचे हे आवडते शहर आहे.
Leave a Reply