कुर्नूल हे आंध्र प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर असून या शहरात जिल्हा मुख्यालय असल्याने अनेक सरकारी कार्यालये येथे आहेत. हैदराबादपासून हे शहर २१२ कि.मी.वर आहे. हे शहर आंध्र प्रदेशातील सातवे, तर देशातील १०५ वे जास्त लोकसंख्येचे शहर आहे. १ ऑक्टोबर १९५३ ते ३१ ऑक्टोबर १९५६ याकाळात या शहरात आंध्र प्रदेशची राजधानी होती.
प्रेक्षणीय शहर
कुर्नूल हे शहर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ ने हैदराबादशी जोडलेले असून, येथील बस स्थानक हे आंध्र प्रदेशातील तिसरे मोठे बसस्थानक आहे. हैदराबादहून रेल्वेनेही कुर्नूलला जाता येते. येथील बेलम गुहा, रॉयल किल्ला ही ठिकाणे प्रेक्षणीय आहेत.
Leave a Reply