किर्गिझस्तान, अधिकृत नाव किर्गिझ प्रजासत्ताक, हा मध्य आशियातील एक देश आहे. इ.स. ११९१ सालापर्यंत किर्गिझस्तान हे सोव्हियत संघाचे एक प्रजासत्ताक होते. बिश्केक ही किर्गिझस्तानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
वर्तमान किर्गिझस्तानाच्या भूभागावर प्राचीन काळी सिथियन टोळ्यांची वस्ती होती.
अरबांशी व्यापार करणाऱ्या तुर्क व्यापाऱ्यांमार्फत इ.स.च्या ७व्या शतकापासून मध्य आशियात इस्लाम पसरू लागला. इ.स. ८४० साली जॉर्डन राजाच्या आधिपत्याखाली किर्गिझ लोकांनी उय्गुर खाखानतीवर विजय मिळवला व राज्याच्या सीमा पूर्वेकडे विस्तारल्या. पुढील दोनशे वर्षे थ्यॅन षान पर्वतरांगांपर्यंतच्या भूप्रदेशावर किर्गिझांची हुकमत अबाधित राहिली. मात्र इ.स.च्या १२व्या शतकात मंगोलांच्या आक्रमणापुढे किर्गिझांची पीछेहाट होत, आल्ताय आणि सायान पर्वतरांगांच्या प्रदेशापुरतीच त्यांची सत्ता उरली. इ.स.च्या १३व्या शतकात मंगोल साम्राज्याच्या उदयामुळे किर्गिझांनी दक्षिणेस स्थलांतरे केली. चंगीझ खानाने इ.स. १२०७ साली किर्गिझांवर विजय मिळवला.
किर्गिझ टोळ्यांवर आणि त्यांच्या मुलखावर इ.स.च्या १७या शतकात मंगोल ओइरातांचे, इ.स.च्या १८व्या शतकाच्या मध्यास मांचू छिंग साम्राज्याचे आधिपत्य होते. इ.स.च्या १९व्या शतकाच्या पूर्वार्धात या प्रदेशावर कोकंदाच्या उझबेक खानतीची सत्ता राहिली. इ.स.च्या एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात रशियन साम्राज्य आणि चिनी छिंग साम्राज्यादरम्यान झालेल्या दोन तहांद्वारे वर्तमान किर्गिझस्तानाचा बह्वंशी भूभाग रशियास तोडून देण्यात आला. किर्गिझिया या तत्कालीन रशियन नावाने ओळखला जाणारा हा भूभाग रशियन साम्राज्यात इ.स. १८७६ साली अधिकृतरित्या सामील करण्यात आला. पुढे झारशाही उलथून सोव्हियेत राजवट आल्यावर सोव्हियेत रशियाचे कारा-किर्गिझ स्वायत्त ओब्लास्त या नावाने या भूभागास ओब्लास्ताचा दर्जा मिळाला. दशकभराने ५ डिसेंबर, इ.स. १९३६ रोजी किर्गिझ सोव्हियेत समाजवादी गणराज्य या रूपाने यास प्रजासत्ताकाचा दर्जा मिळाला.
इ.स. १९९०-९१ दरम्यान किर्गिझ सोव्हियेत समाजवादी प्रजासत्ताकात किर्गिझस्तान लोकशाहीवादी चळवळ जोर धरू लागली. इ.स. १९९१ साली मार्च ते ऑगस्ट महिन्यांदरम्यान झालेल्या राजकीय घडामोडींची परिणती म्हणजे ३१ ऑगस्ट, इ.स. १९९१ रोजी किर्गिझस्तानाचे प्रजासत्ताक सोव्हियेत संघातून फुटून स्वतंत्र झाले.
राजधानी व सर्वात मोठे शहर :बिश्केक
अधिकृत भाषा :किर्गिझ, रशियन
स्वातंत्र्य दिवस :२५ डिसेंबर १९९१
राष्ट्रीय चलन :सोम
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply