गडचिरोली जिल्ह्याचा बराचसा भाग जंगलांनी व्यापला असल्याने येथील आदिवासींची संख्या तुलनेने जास्त आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. आदिवासींच्या घराला ‘टोळा’ असे म्हणतात. गोंड वस्तीच्या गावांमध्ये गावाच्या मध्यभागी ‘युवागृह’ असते. याला ‘गोटूल’ असे म्हणतात. या ‘गोटूल’ मध्ये तरुण – तरुणी एकमेकांना भेटतात, गावकरी एकत्र येतात, तसेच समूहातील समस्या – भांडणेही येथे सोडवली जातात. गोंडी, माडिया, मराठी, हिंदी, तेलगू, बंगाली व छत्तीसगडी या सात भाषा ह्या जिल्ह्यात बोलल्या जातात.
आदीवासी वनांच्या आतल्या भागात राहतात. त्यांच्या देवाचे नाव ‘पेरसा पेण’ आहे. रेळा व ढोल नाच, दिवाळी व होळी हे त्यांचे मुख्य उत्सव आहेत. या जिल्ह्यात एकूण १०० आदिवासी आश्रमशाळा आहेत.
Leave a Reply