लक्झेंबर्गची शाही राजसत्ता हा पश्चिम युरोपामधील एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. लक्झेंबर्गच्या पश्चिम व उत्तरेला बेल्जियम, दक्षिणेला फ्रान्स व पूर्वेला जर्मनी हे देश आहेत. २,५८६ चौरस किमी क्षेत्रफळ असलेल्या लक्झेंबर्गची लोकसंख्या २०११ साली ५,१२,३५३ इतकी होती. लक्झेंबर्ग ह्याचा नावाचे शहर ही ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
इ.स. १८१५ सालापासून स्वतंत्र असलेल्या लक्झेंबर्गमध्ये संविधानिक एकाधिकारशाही स्वरूपाची राजवट असून सध्या राजसत्ता (डची) असलेला हा जगातील एकमेव देश आहे. लक्झेंबर्ग हा जगातील सर्वात प्रगत देशांपैकी एक असून येथील दरडोई उत्पन्न जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. लक्झेंबर्ग संयुक्त राष्ट्रे, युरोपियन संघ, नाटो, आर्थिक सहयोग व विकास संघटना, बेनेलक्स इत्यादी आंतरराष्ट्रीय संघटनांचा सभासद असून युरो हे येथील अधिकृत चलन आहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर :लक्झेंबर्ग
अधिकृत भाषा :फ्रेंच, जर्मन, लक्झेंबर्गिश
राष्ट्रीय चलन :युरो
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply