आंध्रप्रदेशातल्या कृष्णा जिल्ह्याचे हे मुख्यालय आहे. इथे विशेष दर्जा असलेली महापालिका असून इथले बंदर प्रसिध्द आहे. ब्रिटीश काळात या शहराचे नाव मासुलीपट्टणम असे होते. कृष्णा नदी बंगालच्या उपसागराला या ठिकाणी मिळते. ब्रिटीश, फ्रेंच आणि डच यांच्या वखारी या शहरात होत्या. याठिकाणी यांत्रिक बोटींच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते.
वादळाची पूर्व सूचना देणारी मोठी रडार यंत्रणा मच्छलीपट्टणम येथे आहे. तसेच विराट विश्वकर्मा मंदिर, व्यंकटेश्वरास्वामी मंदिर, साई महाराज देवालयम, नागेश्वरस्वामी मंदिर अशी अनेक प्रेक्षणीय मंदिरे येथे आहेत.
Leave a Reply