MENU

महडचा श्री वरद विनायक

महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी हा गणपती. हे स्वयंभू स्थान आहे. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची पूर्वाभिमुख मूर्ती सिंहासनारूढ आहे.

या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. १६९० मध्ये तळ्यात सापडलेल्या या मूर्तीची मंदिरात प्रतिष्ठापना सन १७२५ मध्ये झाली. सन १८९२ पासून तेवत असलेला नंदादीप हे येथील वैशिष्ट्य आहे.

मुंबई-पनवेल-खोपोली मार्गावर खोपोलीच्या अलीकडे ६ किमी. अंतरावर हाळ येथे उजवीकडे महड साठी रस्ता जातो. मुंबई-महड अंतर ८४ किमी. आहे. पुणे-खोपोली-हाळ-महड हे अंतर ८३ किमी. आहे.

या वरदविनायकाचे श्रद्धेने सेवा केल्यास साक्षात दर्शन घडते असा अनुभव सांगतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*