जुन्नर गावातील शंकरपूरा भागात हे गणेश मंदिर आहे. सुमारे १५० वर्षापूर्वी जुन्नर भागात महाजन नांवाचे गणेश भक्त होऊन गेले ते रोज लेण्याद्रीच्या गणपती दर्शनासाठी जात. पुढे वयोमानामुळे श्री गणेशाचे दर्शन अशक्य होऊ लागले. याच काळात त्यांना त्यांच्या घरी एका कोनाड्यात एक फुट उंचीची गणेश मूर्ती सापडली. त्यांनी त्या मूर्तीची पूजा करून प्रतिष्ठापना केली व पुढे गणेश सेवा करीत असता आपला देह ठेवला. त्यानंतर त्यांच्या मुलांनी हे सुंदर गणेश मंदिर बांधले व त्यात या मूर्तीची स्थापना केली.
या मूर्तीला लेण्याद्रीचाच गणपती येथे आला आहे असे मानले जाते.
Leave a Reply