तेव्हा पुण्याची लोकसंख्या होती ९० हजाराच्या आसपास. भाजीपाला आणि फळांचा बाजार शनिवारवाड्याच्या समोरच्या पटांगणात भरत असे. नागरिकांच्या सोयीसाठी मुंबईच्या ‘क्रॉफर्ड मार्केटच्या’ धर्तीवर पुणे शहरातही बंदिस्त मंडई बांधावी, असा विचार करुन १८८२ मध्ये नगरपालिकेत ठराव मांडला गेला. मंडईसाठी शुक्रवार पेठेतील सरदार खासगीवाले यांची बागवजा मोकळी पडलेली चार एकराची जागा ४० हजार रुपयांना खरेदी करून पुण्यातील एक बांधकाम व्यावसायिक वासुदेव बापुजी कानिटकर यांच्यावर बांधकामाची जबाबदारी सोपवण्यात आली.
जवळ जवळ तीन लाख रुपये खर्च करून अष्टकोनी विस्तृत उंच टॉवर असलेली इमारत अडीच तीन वर्षात उभी केली. त्यावेळचे गव्हर्नर ‘लॉर्ड रे’ यांच्या हस्ते १८८६ रोजी या ‘रे मार्केटचे’ शानदार उदघाटन झाले. पुढे १९३९-४० साली आचार्य अत्रे यांनी या वास्तुचे ‘महात्मा फुले मंडई’ असे नामकरण केले.
Leave a Reply